🕒 1 min read
प्रदीप मुरमे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जास्तीत जास्त रक्तदान करण्याचा संकल्प आयोजकाच्यावतीने करण्यात आला होता. स्वराज्य सेवाभावी संस्था व देशमुख हाॕस्पीटलच्यावतीने आयोजित निलंगा शहरातील रक्तदान महायज्ञात तब्बल ६०० रक्तदात्यांनी रक्तदान करुन विक्रम नोंदविला.
रक्तदानाच्या आवाहनाला शहरातील रक्तदात्यांनी यास उत्सफूर्त प्रतिसाद दिल्याने शहरात सोमवारी विक्रमी रक्तदान झाले.या रक्तदान शिबीरात महिलांचा मोठा सहभाग होता. नक्षत्र मंगल कार्यालयात पार पडलेल्या या रक्तदान शिबीरात ५० पेक्षा जास्त महिलांनी यावेळी रक्तदान केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती व्हावी यासाठी आयोजकाच्यावतीने मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालय परिसरात बॕनर लावण्यात आले होते.
भाजपा नेते माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर,काँग्रेसचे नेते अशोकराव पाटील निलंगेकर,जि.प.माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ,नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे आदींनी या शिबीराला भेट देवून रक्तदाते व आयोजकांचे कौतुक केले.
मागील सलग १९ वर्षापासून १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शहरात हा स्तुत्य उपक्रम राबविला जातो.परंतु यावर्षी मात्र लाॕकडाऊनमुळे हा उपक्रम १ जून रोजी राबविला गेला.या शिबीरासाठी स्वराज्य सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष दत्ता शाहीर व देशमुख हाॕस्पीटलचे डाॕ.लालासाहेब देशमुख यांच्यासह त्यांच्या सहका-यांनी अथक परिश्रम घेतले.
एकाचवेळी २८ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आरोग्यमंत्री टोपेंच्या उपस्थित दिला डिस्चार्ज
विरोधी पक्ष म्हणून भाजपा पूर्णत: राज्य सरकारसोबत – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
