Share

कोरोना मुळे धुळे शट – डाऊन

Published On: 

धुळे प्रतिनिधी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समस्त देशवासीयांना जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले होते.याला धुळे जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.आज धुळे शहरात नागरिकांनी प्रधानमत्र्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बाहेर पडणे टाळले.
फक्त मेडिकल सेवा आणि किराणा दुकाने (काही मोजकीच)वगळता कडकडीत कर्फ्यु पाळण्यात आला आहे.

धुळ्याच्या ग्रामीण भागाचा विचार करता.साक्री,शिरपूर आणि शिंदखेडा परिसरात लोकांनी या जनता कर्फ्यु मध्ये स्वतःला समाविष्ट करून घेतले.
अगदी गाव खेड्यांपर्यंत लोकं आज घरातच थांबलेले दिसून येत आहेत.

कालच धुळ्याचे आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील परिस्थिती लोकांसमोर मांडली होती.यात धुळ्यात अजून कोरोनाचा एकही रुग्ण नाही. पण राज्यातील वातावरण परिस्थिती पाहता आणि आपल्या जिल्ह्यातील नागरिकांचे इतर ठिकाणी असणारे स्थलांतर पाहता परिस्थिती खूपच बिकट आहे. यासाठी समस्त धुळेकरांनी काळजी घ्यावी.त्याचबरोबर या आजाराच्या उपचारासाठी असणारी व्यवस्था अतिशय तोकडी आहे.धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात फक्त ८० बेड ची क्षमता उपलब्ध असणारे हॉस्पिटल आहे.त्यामुळे रुग्ण वाढले तर परिस्थितीत नियंत्रण करणे अवघड जाईल.जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आज दिवसभर बंदच ठेवली होती.त्याचबरोबर जिल्ह्यात पुणे – मुंबई आणि इतर शहरातून परतणाऱ्या लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेला कामाला लागण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!