Share

अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत – निलेश राणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आहे. यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मराठा समाजातील नेत्यांसह भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. तर, बंगालच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अदृश्य हात असल्याने ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कधी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत उलट मराठा आरक्षण विरोधी त्यांनी भूमिका घेतली, असा आरोप राणेंनी केला आहे.

‘मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत पण मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही याकरिता अनेक वेळा त्यांची भूमिका जाणवली. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले. अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत,’ असा घणाघात निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!