🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यात वाढता कोरोना संसर्ग पाहता, महाविकास आघाडी सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आले. तसेच मास्कचा वापर, हात धुणे, सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे सांगण्यात येत आहे. परंतु मास्कचा वापर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उदासीन असल्याचे चित्र माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या मुलाच्या लग्नात बघायला मिळाले.
मार्च महिन्यापासून महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले. त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडला. एप्रिल महिन्याच्या शेवटी शासनाला ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लावावे लागले. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री वारंवार मास्क परिधान करण्याबाबत आवाहन करत आहे. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुतांश नेते या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत आहे.
याची प्रचीती मंगळवारी चिते पिंपळगाव येथे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या मुलाच्या लग्नात पहायला मिळाली. कोणतेही नियम न पाळता झालेल्या या लग्नात अनेक नेते मंडळींना मास्कचा विसर पडला होता. त्याचे फोटो आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तसेच यासाठी लग्नाचे आयोजक वाघचौरे यांचे व्याही चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- लातूरमध्ये छुप्या मार्गाने देशी दारूची विक्री सुरूच
- मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग केला बंद
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता : महाजन
- ‘सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही ह्याचं खापर पण केंद्र सरकारवर टाका’
- कोरोनामुळे महिला आयपीएल स्पर्धाही स्थगित; मात्र ‘या’ स्पर्धेत खेळण्याची मिळाली संमती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
