Share

आदित्य ठाकरे यांनी उद्धवजींना अभिप्रेत आहे असे काम करुन दाखवावे, मला आनंद वाटेल – राणे

Published On: 

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते तसेच भाजप नेतेही उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी आपल्या भाषणातून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

दरम्यान, आज राणेंनी शिवसेनेच्या नेत्यांवर शरसंधान केले मात्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आदित्य ठाकरे माझ्या दृष्टीने टॅक्स फ्री आहेत, मी काही बोलणार नाही. मी त्यांना शुभेच्छा देईन. उद्धवजींना अभिप्रेत काम करुन दाखवा, मला आनंद वाटेल. सर्वांचे स्वागत करतो.

सन्माननीय आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी इथला अभ्यास करावा. 481 पानांचा टाटांचा रिपोर्ट वाचावा. निसर्ग कसा ठेवावा, पायाभूत संरचना कशा उभ्या कराव्यात. हे समजून घ्या आणि त्यासाठी पैसे द्या असं देखील राणे आपल्या भाषणात म्हणाले.

दरम्यान, नारायण राणेंनी आपल्या भाषणात चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच स्थानिक पातळीवर त्यांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर तोफ डागली. “विमानतळाला विरोध करणारे इथे स्टेजवरच आहेत, भांडं काय फोडायचं आणि किती फोडायचं?” असा सवाल करत नारायण राणेंनी विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

उद्ववजी विनंती आहे. याच जागेवर मी भूमिपूजन करायला आलो. त्यावेळी आंदोलन होत होतं. भूमिपसंपादन करून देणार नाही. आम्हाला विमानतळ नको. आपल्या त्यावेळच्या राजवटीत मी मंजूर केलं. किती विरोध किती विरोध… मी नाव घेतलं तर राजकारण होईल. आज हायवे. अजित पवारांनी नाव घेतलं. हा हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आमचं काय भागवा आणि रस्ता सुरू करा. कोण अडवत होतं. विचारा जरा. सीवर्डसाठी अजित पवारांनी 100 कोटी दिलं. काय झालं हो. कोणी सीवर्ड कॅन्सल केलं. भांडं काय फोडायचं किती फोडायचं. तुम्ही समजतात तसं नाहीये. म्हणून परिस्थिती बदलतेय, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!