टीम महाराष्ट्र देशा : देशातील प्लास्टिकचा गैरवापर पाहता महाराष्ट्रासह देशाला प्लास्किटमुक्त करावे, प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रासह देशाला प्लास्किटमुक्त करावे, प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि प्लास्टिक वापरावर निर्बंध घालणारा कायदा अजून कठोर व्हावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी जावडेकर यांच्याकडे केली. तसेच प्लास्टिकबंदी कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेतला जात नाही ना, याचीही चौकशी करावी अशीही मागणी आदित्य ठाकरे यांनी जावडेकरांकडे केली.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या प्लास्टिक बंदीच्या मागणीला ‘येत्या आठवड्यात देशभरातील तज्ज्ञांची यासंदर्भात बैठक घेणार असून त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं जावडेकर यांनी सांगितले. या भेटीदरम्यान शिवसेनेचे अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

