🕒 1 min read
क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीन एक दिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ (Mohommad Kaif ) हिंदी कॉमेंट्री पॅनलचा भाग आहे. क्रिकेट चाहत्यांना मोहम्मद कैफची कॉमेंट्री ऐकायला आणि बघायला आवडते. अशा स्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्याच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यांमध्ये कॉमेंट्री करत असताना मोहम्मद कैफने भारतीय संघाचा स्पिनर गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) खिल्ली उडवली आहे. मोहम्मद कैफने चहलच्या शरीराची खिल्ली उडवत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे.
न्युझीलँडविरुद्धच्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर भारतीय संघ पूर्णपणे असह्य दिसत होता. या सामन्यामध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने 49 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. अय्यरशिवाय या सामन्यामध्ये कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळण्यात यश मिळाले नाही.
दरम्यान, स्पिनर गोलंदाज युजवेंद्र चहल याला फलंदाजीसाठी यावे लागले. चहलने 21 चेंडूमध्ये फक्त आठ धावा केल्या. तर या त्याच्या छोट्या खेळीदरम्यान तो जखमी देखील झाला. चहल जखमी झाल्यानंतर हिंदी कॉमेंट्री पॅनलचा भाग असलेल्या मोहम्मद कैफने त्याची खिल्ली उडवली आहे.
लॉकी फर्ग्युसनच्या 43 व्या षटकात मोठा शॉट खेळायच्या नादात चहल जखमी झाला. त्यानंतर फिजिओ चहलला बघण्यासाठी जेव्हा मैदानावर आला, तेव्हा कॉमेंट्री करणारा कैफ म्हणाला की, “शरीरामध्ये मासाची कमतरता आहे, तर हाडे जास्त आहेत.” कैफच्या या शब्दानंतर चाहते नाराज झाल्याचे चित्र दिसले. यापूर्वी मोहम्मद कैफ कधीच असे शब्द वापरताना दिसलेला नाही. तर नॅशनल टीमच्या खेळाडूंवर अशी टीका करणे कॉमेंट्री करणाऱ्यांनी नेहमी टाळले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
- Atul Bhatkhalkar | “एकनाथ शिंदे त्यांच्यासारखे रिकामटेकडे आणि…”; आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर भाजपाचा टोला
- PM Kisan Yojana | PM किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्डसोबत ‘हे’ डॉक्युमेंट पण करावे लागेल लिंक
- Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांना शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही – संजय राऊत
- IIFA 2023 | अबुधाबीमध्ये पुन्हा एकदा रंगणार आयफा अवॉर्ड सोहळा, ‘हे’ स्टार्स करणार कार्यक्रम होस्ट
- Vikram Kirloskar Death | ‘टोयोटा’ची वेगळी ओळख निर्माण करणारे, विक्रम किर्लोस्कर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
