Share

ममतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अधीर रंजन चौधरींचे प्रत्युत्तर; म्हणाले…

Published On: 

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतल्याननंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजप सोबतच कॉंग्रेसवर देखील निशाणा साधला होता. यावेळी बोलत असतांना त्यांनी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे अस्तित्व आहेच कुठे, असा सवाल करत भाजपा आणि काँग्रेस अशी लढत होते त्याच राज्यांमध्ये भाजपा वाढत असल्याचे सांगत काँग्रेसवर टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, यावर कॉंग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून ममतांच्या या टीकेला कॉंग्रेस नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यातच लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी(Adhir Ranjan Chowdhury) यांनी पलटवार केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना चौधरी म्हणाले की,’ममता बॅनर्जींना यूपीए म्हणजे काय हे माहित नाही का? मला वाटते की त्यांनी वेडेपणा सुरू केला आहे. त्यांना वाटतंय की पूर्ण भारत ‘ममता, ममता’ म्हणू लागला आहे. परंतु भारत म्हणजे बंगाल नाही आणि बंगाल म्हणजे भारत नाही. पश्चिम बंगालमधील मागच्या निवडणुकांमध्ये त्यांनी वापरलेली युक्ती आता हळूहळू उघड होत आहेत.’

दरम्यान, पुढे बोलत असतांना २०१२ मध्ये यूपीए सरकारमध्ये सहा टीएमसी मंत्री होते. ममता बॅनर्जींनी यूपीएला दिलेला पाठिंबा काढून घेण्यासाठी काही कारणे त्यावेळी सांगितली होती. त्यांना त्यावेळी यूपीए सरकार पाडायचे होते. पण त्या यशस्वी झाल्या नाही, कारण इतर पक्षांनी लगेच सरकारला पाठिंबा दिला. ममता बॅनर्जींचे हे जुने षड्यंत्र आहे. आज मोदी त्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. ममता काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे, असा दावाही चौधरी यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!