मुंबई : भारतीय जनता पक्षाची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांच्या तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. काल पवारांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप विरोधात सक्षम विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी हालचाली सुरु केल्या असून ते इतर राज्यातील भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची रणनीती आखत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
दरम्यान पवारांच्या या खेळीवर भाजपने आता टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोजित केलेल्या विरोधकांच्या बैठकीवर हल्लाबोल केला आहे. ‘चिल्लर जमा करून रुपया करता येत नाही,’ अशा शब्दात खासदार निंबाळकरांनी दिल्लीतल्या बैठकीवरून टोला लगावला आहे.
शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रमंचच्या बॅनरखाली विविध पक्षाचे नेते, पत्रकार, राजकीय विश्लेषक, गीतकार अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांची बैठक बोलावली आहे. त्यावरुन भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर आज देशात कुणाची पात्रता नाही. बत्ती बुझने से पहले थोडी जलनी चाहीए, अशी परिस्थिती आहे या पक्षांची. या सर्व पक्षांचे अस्तित्व संपलं आहे ते आता एकत्र येत आहेत. असे अनेक अयशस्वी प्रयोग झाले आहेत. मोडीत निघालेल्या पक्षांना पवार एकत्र करत आहेत.’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
शरद पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला या बैठकीला दिग्गज नेते उपस्थित आहेत. यामध्ये ओमर अब्दुल्ला दाखल. यशवंत सिन्हा, आम आदमी पार्टीचे सुशिल गुप्ता, आरएलडीचे जयंत चौधरी, सपा कडून घनश्याम तिवारी, जावेद अख्तर, पवन वर्मा, के सी सिंग, माजीद मेमन, वंदना चव्हाण, जस्टीस ए पी शाह यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणावरून स्वार्थी राजकारण, छत्रपती संभाजीराजेंची भूमिका आम्हाला मान्य नाही’
- दरेकर, महाजन आणि लाड यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी थांबवली अन् नार्वेकर म्हणाले, यांच्या हाती शिवबंधन बांधा !
- ‘गंगेतून उत्तर प्रदेशातील मृतदेह पश्चिम बंगालमध्ये ; धोका वाढला’
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत चार लाख औरंगाबादकरांवर टांगती तलवार!
- जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय प्रक्रियेला मिळणार गती, सर्वपक्षीय बैठीकडे अवघ्या देशाचे असणार लक्ष


