Share

कोल्हापूरकरांच्या संकटात भर ; राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आता पावसाचा जोर ओसरला आहे. काल दिवसभरात कोल्हापूर शहरात पावसाने हजेरी लावली नाही, त्यामुळे कोल्हापुरकरांची महापुरातून सुटका होणार आहे. पण अजूनही अनेक भागात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 97 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आज दुपारी राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार उघडले आहेत. धरणातून 6 हजार 912 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. कोल्हापुरात आतापर्यंत झालेल्या पावसापैकी विक्रमी पाऊस शुक्रवारी झाला.

यात शुक्रवारी रात्री विक्रमी 56.3 फुटांवर असलेली राजाराम बंधार्‍याची पाणी पातळी शनिवारी रात्री 10 वाजता 53 फुटांवर आली. तर रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास 51 फुटांवर आली. त्यामुळे चिखली गावाला पुराचा वेढा असून, ‘एनडीआरएफ’च्या पथकांकडूनक येथील नागरिकांचे स्थलांतरित केले जात आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हयात NDRFच्या 6 तुकडया दाखल झाल्या असून बचाव कार्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. यावेळी भारतीय लष्कर दलाची 70 जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदत कार्यासाठी दाखल झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 366 गावांना पुराचा फटका बसला असून यामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे. दुसरीकडे या पुरामुळे जिल्हयातील महावितरणची 10 उपकेंद्रे पूर्णत: बंद झाली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!