मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे मध्यंतरी चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करत जनतेसमोर आल्या होत्या. याबाबत धनंजय मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि करुणा मुंडे या त्यांची पत्नी असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. काही महिन्यांनतर हा वाद आता पुन्हा उफाळत आहे. करुणा मुंडे यांनी आज फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून धनंजय मुंडेंवरील सर्व आरोप सिद्ध करणार असल्याचे जाहीर केले आहे.
माझ्यासोबत गेली ७-८ महिने जे सुरु आहे ते सर्व सांगण्यासाठी मी परळीमध्ये रविवारी १२ वाजता जाणार आहे. माझे पती धनंजय मुंडे यांच्या घरी मी पत्रकार परिषद घेणार आहे. मी नेमकी कितवी पत्नी आहे? पाचवी कि सहावी? याबाबतचे सत्य नेमके काय आहे? याचा खुलासा करणार आहे, असं म्हणत करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर टाकली आहे.
आतापर्यंत मला खूप वेळा धमकावलं गेलं आहे. माझ्या हाती अनेक गोष्टी लागल्या आहेत. त्या मी सोशल मीडियावर शेअर करणार तोच मला माझ्या मुलीच्या वयाच्या एका तरुणीने फोन करुन धमकावलं. मी तिला अजिबात घाबरणार नाही, असंही करुणा मुंडे या फेसबुक लाईव्हमध्ये म्हंटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी! ‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना ‘दे धक्का!’
- मराठा आरक्षणातील अडसर दूर होणार ? संभाजीराजेंनी राष्ट्रपतींकडे केल्या ‘या’ २ महत्वाच्या मागण्या
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

