Share

अडसूळ अटक होताच आजारी पडले; आता मुश्रीफांना मात्र कोणीही वाचवू शकणार नाही – सोमय्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवले आहे. तर, अडसूळ यांना अटक करण्यासाठी ईडी पोहोचल्याचे वृत्त समोर येताच त्यांची तब्येत बिघडल्याचे देखील समोर आले. ईडीचे अधिकारी पोहोचताच आनंदराव अडसूळ यांना स्ट्रेचरवरुन बाहेर आणण्यात आलं आणि नंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. यावरून विरोधकांनी आता टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील अडसूळ यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केलं आहे. ‘ईडीने अडसूळ यांना अनेक समन्स पाठवले, पण ते जात नाहीत. अटक होताच आजारी पडले. आता हसन मुश्रीफ यांना तुरुंगात जाण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाहीत. हसन मुश्रीफ यांना कुणीही वाचवू शकणार नाही,’ असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

पुढे सोमय्या म्हणाले,’सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. त्याबाबत अडसूळ आणि उद्धव ठाकरे कुणीच उत्तर देत नाही. अडसूळ पिता-पूत्र यांनी कोट्यवधी रुपये खासगी खात्यात वळवले. बाप-बेटे मजा मारत आहेत. कर्नाळा बँक प्रकरणातही कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी ईडीला कारवाई करावी लागली. त्याचं मी स्वागत करतो.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!