🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते. तिने अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मने जिंकून घेतली आहे. आता तापसी एका खास चित्रपटाद्वारे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाली आहे.
दरम्यान सोशल मिडीयावर तिने ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. तापसी या चित्रपटातील पहिला लूकचा फोटो शेअर केला आहे. या लूक मधून असे दिसून येत आहे की, ती एका धावपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. धावपटूच्या भूमिकेत असल्यामुळे तापसी आगामी चित्रपटासाठी खूप मेहनत घेतांना दिसत आहे. आता ती दररोज व्यायामसुद्धा करत असल्याचं सुत्रांनी माहिती दिली आहे. याशिवाय सोशल मीडियावर तिनं तिच्या जिममधील काही फोटो शेअर ही केले आहेत. तापसीची ही मेहनत बघून आता चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली असून तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी भरपूर लाईक आणि कमेंटस् केली आहे.
अभिनेत्री तापसी ‘थप्पड’,’बदला’, ‘पिंक’, ‘हसीन दिलरुबा’, ‘जुडवा २’, ‘कांचना २’ अश्या अनेक चित्रपटात तिने अभिनयाची छाप पडली आहे. तापसीच्या ‘रश्मी रॉकेट’ या आगामी चित्रपटासाठी चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. मात्र आगामी काळात तिच्या अभिनयाची जादू कितपत टिकेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- ‘शरद पवारांचे नाव घ्यायची तुमची लायकी आहे का?’, मुश्रीफांचा सोमय्यांना संतप्त सवाल
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
