Share

पुणे : ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला सोन्याची अंगठी चोरताना अटक

Published On: 

पुणे : कॅम्प परिसरातील एका प्रसिद्ध मॉलमधील दागिन्यांच्या दुकानात ही अभिनेत्री सोनं खरेदी करण्याच्या बहाण्याने गेली. त्यावेळी तिने दोन सोन्याच्या अंगठ्या चोरल्या. स्नेहलता पाटील असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सीसीटीव्हीत आरोपी अभिनेत्री दुकानदाराशी अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलताना दिसत आहे. ती दुकानदाराला वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या दाखवण्यास सांगते. दुकानदार अंगठ्या दाखवण्यात गुंग असतानाच आरोपी अभिनेत्री चलाखीने सोन्याच्या अंगठ्या चोरताना दिसत आहे. तिच्यावर सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्याचा आरोप आहे.

तसेच या अंगठ्यांची किंमत जवळपास ५० हजार रुपये इतकी असल्याचं समजतंय. लष्कर पोलीस ठाण्यात या अभिनेत्रीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्हीच्या मदतीने तिला तात्काळ अटक करण्यात आली. स्नेहलता पुण्यातील कोथरुड येथे राहणारी असून तिने तीन हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!