नवी दिल्ली : टिकरी येथे शेतकरी आंदोलनात सामील झालेल्या २५ वर्षीय तरुणीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आले आहे. पीडित तरुणीचा ३० एप्रिल रोजी करोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
एक कोविड संक्रमित महिला के साथ टिकरी बॉर्डर पर बलात्कार होता है, ६ लोगों पर FIR होती है जिसमें २ अरविंद केजरीवाल की पार्टी के नेता है। #बलात्कारी_आंदोलनजीवी इस मामले को दबाना चाहते है…
क्या किसानों के नाम पर चलाया जा रहा ये आंदोलन महिलाओं के साथ बलात्कार का अड्डा बन गया है? pic.twitter.com/T06E3lh3tc
— Amit Malviya (@amitmalviya) May 10, 2021
मृत तरुणीच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत 6 जणांची नावे घेतली आहेत. अनिल मलिक, अनूपसिंग छनौत, अंकुर सांगवान, कविता आर्य, जगदीश ब्रार आणि योगिता सुहाग अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व लोक संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने बंगालमध्ये गेले होते. त्यावेळी ती मुलगी आणि तिच्या वडिलांना हे सर्व भेटले. मृत पीडितेने तेव्हा आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
पुढे ही तरुणी आरोपींच्या सोबत दिल्लीकडे आंदोलनासाठी निघाली असताना आरोपीनं दिल्लीतील टिकरी बॉर्डरजवळ पोहोचल्यानंतर तरुणीवर हल्ला केला आणि बलात्कार केला. या घटनेच्या एका आठवड्यानंतर महिलेला करोनाची लक्षणं दिसून आली. त्यानंतर पीडितेला करोना झाल्याचं निष्पन्न झालं. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी बहादूरगढ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. किसान सोशल आर्मी संघटना चालवणाऱ्या अनूपसिंग आणि अनिल मलिक या दोघांची नावं एफआयआरमध्ये असून, या घटनेचे पडसाद पडू लागताच किसान मोर्चानं टिकरी बॉर्डरवरील किसान सोशल आर्मीचे टेंट आणि बॅनर काढून टाकले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे २ हजार बाधित रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू : आरोग्यमंत्री
- ही कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना ?, ठाकरे सरकारमधील मंत्र्याला संशय…
- …तर आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये इंग्लंडचे क्रिकेटपटू खेळणार नाहीत
- १८-४४ वर्षांवरील लसीकरणाचा वेग मंदावणार ; जेष्ठांना प्राधान्य
- मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाला आरक्षण द्या, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

