Share

अभिनेत्री प्राजक्ता माळीने केले ‘या’ माजी मंत्र्याचं तोंडभरुन कौतुक; नेटकरी म्हणाले पैशासाठी ‘ही…’

Published On: 

🕒 1 min read

यवतमाळ : मराठी सीनेअभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हीने यवतमाळमध्ये शिवसेनेचे माजी मंत्री आमदार संजय राठोड (Sanjay Rathore) यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. संजय राठोड यांनी त्यांच्या मतदार संघातील दिग्रस येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुल या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या भूमिपूजनासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह महाराष्ट्राची ‘हास्य जत्रा’ फेम अरुण कदम, (Arun Kadam) समीर चौगुले (Sameer Chougule) यांना बोलावण्यात आलं होतं.

यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली, ‘संजय राठोड यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलला. कबड्डी खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणारं हे शहर आता अपराजित आमदार संजय राठोड यांचा मतदारसंघ म्हणून ओळखलं जातं. यात सर्वकाही आलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावाने साकारत असलेल्या या नाट्यगृहाच्या भूमिपूजनाचा मान मला आणि माझे सहकारी अरूण दादा, समीर दादा यांना मिळावा हे आमचं अहोभाग्यच आहे, असे प्राजक्ता माळी यावेळी म्हणाली.

यावेळी आ. संजय राठोड म्हणाले, दिग्रस येथे साकारत असलेल्या सर्व सोईंनी सुसज्ज अशा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह व डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम व्यापारी संकुलाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या संस्थेने १९९०-९९ या १० वर्षाच्या काळात विदर्भ एकांकिका स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून नाट्यकलावंताचा मंच या दिग्रस शहरात उभा केला. या ठिकाणी जिल्हा प्रशासकीय भवनाची इमारत मंजूर केली. त्याचंही काम दिग्रसमध्ये सुरू आहे. असे संजय राठोड म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. फेसबुकवर एक नेटकरी प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘पैशांसाठी लाचार असतात हे कलाकार. यांच्याकडून फारशा अपेक्षा नसतात. पण किमान आपण कुणासाठी, कुठे जायाचं हे तर कळलं पाहिजे, प्राजक्ता माळीला पूजा चव्हाण पेक्षा पैसा महत्वाचा वाटतो. बहुतेक तीला राठोडवर असलेल्या बलात्काराच्या आरोपाशी देणंघेणं नाही.’ अशी टीका सोशल मिडीयावर होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!