Share

“अन्न हे पुर्णब्रह्म” म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळीने चाहत्यांना केले आवाहन

Published On: 

मुंबई : देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आल्याने लॉकडाउन करण्यात आले आणि सर्व काम ठप्प झाले. त्यामुळे चित्रीकरण देखील बंद करण्यात आले. अशातच बरेचसे कलाकार घरातच आहे. हा वेळ कलाकार आपल्या घरांतल्यासोबत घालवत आहे आणि याचे काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तीच्या कामाबाबत अपडेट देत असते. यावेळी देखील  प्राजक्ता माळीने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CPaALn3j2i4/?utm_source=ig_web_copy_link

प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर नऊवारी साडीतील फोटो शेअर करत यात म्हंटले की, खाली बसून, मन लावून, ताजं अन्न,”अन्न हे पुर्णब्रह्म” हे आठवून खा. जशी आपली आजी-आजोबांची पिढी खाण्याबाबतीत नियम पाळायची, जे खायची, ते खा आणि निरोगी रहा. सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

प्राजक्ताने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. प्राजक्ता माळीने आपल्या सुंदरतेने तसेच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताच्या अभिनयावर तिचे चाहते फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!