Share

TV actress | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले स्वतःशीच लग्न; ‘सोलोगॅमी’ची वाढती क्रेझ

Published On: 

महाराष्ट्र देशा डेस्क : ‘सोलोगॅमी’ म्हणजेच स्वतःशी लग्न करणे ही संकल्पना जगभर वेगाने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या क्षमा बिंदू नावाच्या एका तरुणीने स्वतःशीच लग्न केल्याची बातमी समोर आली होती. या लग्नात तिने साधारण लग्नात असणारे सर्व विधी केले होते. त्यानंतर हि तरुणी हनीमूनलाही गेल्याच वृत्त आलं होत. याच प्रकारे आता एका टीव्ही अभिनेत्रीने स्वतःशीच लग्न केलं असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्री कनिष्का सोनीने स्वतःशी लग्न केले आहे. कनिष्काने 16 ऑगस्ट रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

कनिष्काने तिच्या सोशल मीडिया हँडलवर सिंदूर आणि मंगळसूत्र घातलेल्या १ फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “मी स्वतःशी लग्न केले आहे. कारण मी माझी स्वप्ने स्वतः पूर्ण केली आहेत. त्यामुळे मी ज्या व्यक्तीवर प्रेम करते, ती व्यक्ती मी स्वतः आहे. मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही. मी एकटी असण्यातच माझा आनंद आहे. मी आणि माझी गिटार एकसोबत शांत आयुष्य जगत आहोत. मी एक देवी आहे. बलवान आणि सामर्थ्यवान आहे, शिव आणि पार्वती दोघेही माझ्या आत आहेत.”

https://www.instagram.com/p/Cg544uCspGL/?hl=en

कनिष्काचे करिअर खूप चांगले चालले होते, पण त्याच दरम्यान तिने टीव्ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. तिने दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत तिने सांगितले होते की, आता तिला तिच्या अभिनयाला अधिक उंचीवर नेण्याची इच्छा आहे, त्यामुळे तिला हॉलिवूडवर लक्ष केंद्रित करायचे आहे. यामुळे तिने हिंदी टीव्ही इंडस्ट्री सोडली होती. कनिष्काने ‘दिया और बाती हम’, ‘दो दिल एक जान’, ‘बाल वीर’, ‘भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप’ बेगुसराय आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ यांसारख्या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!