🕒 1 min read
मुंबई : सोनी मराठी वरील ‘आई माझी काळुबाई’ हि मालिका सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. मालिका सुरु झाली तेव्हा या मालिकेच्या सेटवरील सर्व कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री अशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. नंतर हि मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात वाद चांगलाच पेटला होता. प्राजक्ताने या मालिकेतून माघार घेतल्यानंतर हा वाद पेटला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मालिकेतील सर्व कलाकारांना भेटीचे निमंत्रण दिले होते.
याप्रसंगी काल अभिनेत्री अलका कुबल यांनी बारामतीतल्या ‘गोविंदबाग’ या पवारांच्या निवासस्थानी ही भेट घेतली. अलका कुबल यांनी शरद पवारांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माता नवीन ग्रामीण भागाचे चित्रीकरण करावे अशा सूचना देखील पवारांनी यावेळी केल्या. तसेच अलका कुबल यांच्यासह निर्माते दिग्दर्शक समीर आठवले, अभिनेत्री प्राजक्ता दिघे, आमदार मकरंद पाटील आणि निखील घाडगे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील कारणामुळे या ठिकाणातील निसर्गरम्य वातावरण प्रेक्षकांना भाग घेऊ शकतो तसेच यामुळे ग्रामीण अर्थकारणाला होईल फायदा होऊ शकतो अशी पवार यांची भूमिका होती. याआधी या मालिकेच्या वादाप्रसंगी अलका कुबल यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. यावेळी उदयनराजे यांनी अलका कुबल यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसोबत फोनवर चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती देखील केली होती.
महत्वाच्या बातम्या
- जे नेते स्वतःच्या पक्षाच्या नेत्याचे ऐकत नसतील त्यांचं लोकं किती ऐकतील ?
- आमची मोर्चेबांधणी आणि तटबंदी काय असते याची भाजपला चांगली कल्पना – संजय राऊत
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही – राष्ट्रवादी
- आता केवळ एका मिस्ड कॉलद्वारे करता येणार गॅस सिलेंडरचे बुकिंग
- … तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन ही हेरगिरी केली ? राष्ट्रवादीचा भाजपला थेट सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
