मुंबई- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. मात्र हा लॉकडाऊन शेतकरी वर्गासाठी मोठा नुकसानीचा ठरला आहे. या काळात दूध दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दूध दरामध्ये मोठी घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. महायुती आणि राजू शेट्टी यांनी या विरोधात आवाज बुलंद केला आहे. शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तर दूध संप पुकारत अनेक ठिकाणी दुधाचे टँकर फोडत दूध विक्री बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
दुधाचे टँकर फोडत दूध रस्त्यावर ओतून देणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर अभिनेत्री आकांक्षा पुरी चांगलीच संतापली आहे. आकांक्षा पुरी हिने दूध रस्त्यावर ओतून आदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर जोरदार टीका केली आहे.
My blood boils after seeing this ,,,dumping milk on street ???? Are you guys for real ???????? Shameless people !!what are you doing on the name of protest !! Millions of people are dying of hunger n thn I see this !! This visual gives me chills ,,stupid bunch of people https://t.co/B3kRKHeHvl
— Akanksha Puri (@akanksha800) July 21, 2020
टँकरमधून दूध रस्त्यावर ओतलं जात असतानाचा एक व्हिडिओ ट्वीट करत आकांक्षा पुरी हिनं म्हटलं आहे की, ‘हे पाहून माझं रक्त खवळलं आहे. आंदोलनाच्या नावाखाली असं दूध वाया घालवणाऱ्यांना लाज वाटायला हवी. लाखो लोक भूकेमुळे मरत असताना हे पाहायला मिळत आहे. असं करणारे लोक मुर्ख आहेत,’ अशा शब्दांमध्ये आकांक्षाने आपला संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करावी’
श्रावणात तरी मंदिरं खुली करा, शिवसेना नेते चांद्रकांत खैरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी
भाजपचे तोंड बंद आंदोलन तर भिडेंकडून अजून सातारा सांगली बंदची हाक नाही, राऊतांचा टोला
सरकारी कोविड सेंटरपेक्षा मराठी शाळांची सुविधा उत्तम; राळेगणसिद्धिच्या ग्रामस्थांची भूमिका !
‘आमच्या रागारगात शिवछत्रपतींचे रक्त, पुन्हा एकदा दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकवू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

