मुंबई : ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचा सूत्रसंचालक ख्रिस रॉकला कानाखाली मारल्याचं प्रकरण खूप गाजलं होतं. या प्रकरणावरून वाद निर्माण झाल्याकारणानं अभिनेता विल स्मिथनं ॲकडमीचा राजीनामा देण्याचं मोठं पाऊल उचललं आहे. विल स्मिथनं राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा माफी मागितली आहे.
विल स्मिथनं आपल्या माफीनाम्यात म्हटलंय,”ॲकडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देत आहे. यानंतर बोर्डाकडून जो निर्णय घेण्यात येईल तो मला मान्य आहे. 94 व्या ॲकडमी अवॉर्ड्सच्या दरम्यान माझ्याकडून जे काही कृत्य घडलं ते अत्यंत निंदनीय आणि अक्षम्य होतं. ज्या लोकांना माझ्या या कृत्यामुळे त्रास झाला त्यांची यादी मोठी आहे. त्यात ख्रिस, त्याचा परिवार, माझे अनेक मित्र याशिवाय माझे अनेक चाहते यांचा देखील यात समावेश आहे.
विलचा राजीनामा स्वीकार
स्मिथचा राजीनामा स्वीकार करण्यात आला आहे, असं फिल्म ॲकडमीचे अध्यक्ष डेव्हिड रुबिनने स्पष्ट केलं आहे. ॲकडमीच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्यामुळे स्मिथ यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातली पुढील बैठक 18 एप्रिलच्या आधी आहे.
महत्वाच्या बातम्या :


