मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सुरज थापर यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. त्याना तीन दिवसापासून ताप होता अशी माहिती समोर येत आहे. तसेच त्यांची ऑक्सिजन पातळीही खालावली यामुळे त्यानां आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गोव्यावरुन चित्रीकरण संपवुन परतत असताना त्यांना त्रास सुरु झाला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली मात्र कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली की नाही याबाबत अद्यापही महिती कळाली नाहीये. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु लागल्यामुळे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन लागु केले. त्यामुळे चित्रीकरणासाठी परवानगी नसल्याने अनेक मालिकेचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात होत आहे.
सुरज थापर हे स्टार प्लस या वाहिनीवरील ‘शौर्य एक अनोखी कहाणी’ या मालिकेत भूमिका करत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ते गोव्याला गेले होते. गोव्याहुन परतल्यानंतर त्यांना त्रास सुरु झाला. दरम्यान त्यांना तीन दिवसापासून ताप येत होता. त्यांनी याकडे दुर्लक्ष केले मात्र मुंबईत आल्यावर त्यांचा ताप अचानक वाढला आणि ऑक्सिजन पातळीही घसरली. यामुळे त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- ऑक्सिजन निर्मितीबाबत नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दिशाभूल सुरु आहे – गावीत
- ‘देशाला पंतप्रधानांचे निवास नव्हे, श्वास पाहिजे’, राहुल गांधींची टीका‘
- विराट पाठोपाठ कोरोना लढ्यात सीएसकेचा पुढाकार
- मुंबई महापालिकेने लस खरेदी करून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करावे – भातखळकर
- मराठा आरक्षणाच्या विषयावर कोणीही राजकारण न करता एकदिलाने काम करावे : शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

