Share

‘घरासाठी लोकांनी झाडं तोडली, आता घरं पाडून झाडं लावायची वेळ आलीय’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ‘आतापर्यंत घरांसाठी लोकांनी झाडं तोडली मात्र आता घर पाडून झाडं लावायची वेळ आलीय. झाडं लावणं हा थॅंक्सलेस जॉब असून इथं प्रसिद्धी मिळत नाही. माणूस खोटा आणि घातक असल्यानं वाट लागली आहे असा आरोप सयाजी शिंदे यांनी केला आहे.

पुण्यात रविवारी अभिनेते सयाजी शिंदे लिखित तुंबारा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पाडला. संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘कुठलंही झाड हा माणूस भ्रष्टाचारी आहे असं म्हणत नाही,’ असे ते म्हणाले.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, ‘झाड म्हणत नाही की, हा भ्रष्टाचारी आहे. मात्र खाऊन मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. उपाशीपोटी मरणाऱ्यांची संख्या कमी आहे. खाऊन जास्त आजार होतात. मात्र खाणाऱ्यांना खाऊ द्या आणि लवकर मरु द्या”, असं प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले.

दरम्यान, वृक्ष हे तपस्वी ऋषीसारखे आहेत. मात्र तपश्चर्याला बसलेल्या ऋषींची कत्तल केली जात आहे. त्यामुळे आता जनजागृतीसाठी वृक्ष संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातील डोंगरावर 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी वृक्ष संमेलन होणार आहे. यामध्ये वडाचं झाड हे या संमेलनाचं अध्यक्ष असणार आहे. वृक्ष संमेलन संकल्पना जिल्हापुरती असून जिल्ह्यात वृक्षसुंदरीच किताब दिला जाणार आहे. विश्वसुंदरी पेक्षा वृक्षसुंदरी असावी. प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी वेगवेगळ्या संमेलन करण्याचे संकल्पना आहे”, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!