मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन ची घोषणा केली. यामुळे मोठमोठ्या कंपन्यांपासून ते कलाविश्वापर्यंत सर्व काही बंद आहे. याचकारणास्तव इतर नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटी देखील घरात आहे.
‘न्युज18 ‘च्या वृत्तानुसार, अभिनेता अक्षय कुमारने लॉकडाउनची तुलना ‘बिग बॉस’ या शोबरोबर केली आहे. एका रेडिओ इंटरव्ह्युमध्ये तो बोलत होता. यावेळी बोलताना अक्षयने लॉकडाऊन’ म्हणजे नेमकं काय ? हे सांगताना लॉकडाउनची तुलना ‘बिग बॉस’ या रिअलिटी शोबरोबर अक्षयने केली आहे.
‘तुम्ही सलमान खानचा रिअलिटी शो बिग बॉस बघता? सध्या त्या कार्यक्रमासारखी परिस्थिती झाली आहे. देव आता बिग बॉसच्या रुपात आहे. त्यामुळे आपण घरातच रहावं अशी त्याची इच्छा आहे,’ असं अक्षय’ने पुढे म्हणले आहे.
दरम्यान, ‘घरात स्वच्छता राखेल आणि आरोग्याची काळजी घेईल. मी सगळ्यांना केवळ एवढंच सांगू इच्छितो की सगळ्यांनी घरात रहा आणि आरोग्याची काळजी घ्या,’ असं आवाहन अक्षय कुमारने नागरिकांना केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

