पुणे : अभिनेता आरोहच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. छोट्या पडद्यावरील हा मम्मीचा लाडका आता खऱ्या आयुष्यात बाबा होणार आहे.

दीर्घकालीन मैत्रीण अंकिता शिंघवी सोबत तीन वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकला. अंकिता आणि आरोहची भेट कॉलेज कॅम्पसमध्ये झाली होती. आधी मैत्री आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होत.

आरोहच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्याच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. सोशल मिडीयावर सक्रिय असणाऱ्या आरोहने नुकतेच इन्स्टाग्रामवर कार्यक्रमातचे फोटो शेअर केले आहेत त्याच्या या फोटोला बरीच पसंती मिळत आहे. आरोह वेलणकर आणि पत्नी अंकिता शिंघवी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

आरोह आणि त्याची पत्नी या चिमुकल्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चिमुकल्याच्या चाहूलीने सगळेच आनंदी दिसत आहे. फोटो मध्ये आरोह आणि त्याची पत्नी फार आनंदी दिसत आहेत.

दरम्यान, देशभरातून शेतकरी आंदोलनाला समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देखील या आंदोलनाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

शेतकरी आंदोलनाविषयी कलाकारांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, मराठी अभिनेता आरोह वेलणकरने देखील महाराष्ट्र देशाशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या
- चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अक्षय कुमार आता ‘या’ कारणामुळे आला चर्चेत
- पुणे : भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- धक्कादायक : भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली


