🕒 1 min read
मुंबई : बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार करत अखेरच्या क्षणी दीपक हुड्डानं स्पर्धेतून मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेतून माघार घेतली. पण आता बडोदा क्रिकेट टीमचा कर्णधार कृणाल पांड्याविरोधात तक्रार करणारा क्रिकेटपटू दीपक हुड्डा आता स्वतःच अडचणीत सापडलाय.
हुड्डाने उचललेलं पाऊल गैरवर्तन असल्याचं बडोदा क्रिकेट असोसिएशनचे(बीसीए) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शिशिर हट्टंगडी यांनी म्हटलं आहे. espncricinfo ने याबाबतचं वृत्त दिलंय. हुड्डाने उचललेलं पाऊल गैरवर्तन असून याबाबत बीसीसीआय आणि हुड्डा ज्या आयपीएल संघासाठी खेळतो त्या दोघांनाही सूचना दिली जाईल असं शिशिर हट्टंगडी यांनी सांगितलं.पुढे बोलताना, ‘संघ व्यवस्थापन आणि बीसीएसोबत चर्चा करुन समस्या सोडवता आली असती, पण त्याने माध्यमांसमोर घटनेचा खुलासा केला. माध्यमांसमोर हुड्डाने केवळ स्वतःची बाजू मांडली आणि सहानुभूती मिळवली प्रसिद्धी मिळविण्याचा आणि खेळापेक्षा स्वत:ला जास्त महत्त्व देण्याचा हा प्रयत्न आहे, असं शिशिर हट्टंगडी म्हणाले.
तसेच, “मतभेद नाहीत असा एकही संघ नाहीये. पण माध्यमांसमोर केवळ आपली बाजू मांडणं, स्पर्धेतून स्वतःचं नाव मागे घेणं हे योग्य नाहीये…यामुळे बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिमेला धक्का बसला असून आवश्यक कारवाई करू” असं शिशिर हट्टंगडी यांनी सांगितलं. याशिवाय, संघ व्यवस्थापनाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही केला होता पण त्यानंतरही हुड्डाने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असंही हट्टंगडी यांनी नमूद केलं.
महत्वाच्या बातम्या
- आमच्या सुरक्षेत कपात केल्याने आमच्या कामात तसूभर ही फरक पडणार नाही – दानवे
- मराठा आरक्षणासंदर्भात आज नवी दिल्लीत वकिलांची बैठक
- ‘औरंगाबाद की संभाजीनगर हे राजकारणाचे खेळणे’
- आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा
- धक्कादायक: ‘बर्ड फ्लू’मुळेच दगावल्या परभणीतील 800 कोंबड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
