🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (Maharashtra State Cooperative Bank) साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता ईडी कार्यालयात तनपुरे यांच्या चौकशीला सुरुवात झाली होती. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यामुळे ठाकरे सरकारमधील अजून एक मंत्री आता ईडीच्या रडारवर आहे. आता यावरच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरेंच्या नावाने ट्रान्सफर करण्यात आला. १०० कोटीची संपत्ती १३ कोटीत दिली गेली. तीच संपत्ती तनपुरे यांनी अनिल देशमुख यांना पास ऑन केली. प्राजक्त तनपुरे हे अनिल देशमुखांच्या वाटेवर असून त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख यांनी बेनामी पद्धतीनं प्राजक्त तनपुरे यांच्याद्वारे रामगणेश गडकरी साखर कारखाना काबीज केला. त्याचे पुरावे बाहेर आले आहेत, त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.
1 more Minister of Thackeray Sarkar, Shri Prajakt Tanpure is now under ED Investigation for acting as "BENAMI" of Anil Deshmukh in Ram Ganesh Sahkari Sakhar Karkhana Deal & Money Laundering. ₹100 Crore Assets in ₹13 Crore !!? @BJP4India @Dev_Fadnavis pic.twitter.com/oF9uDgj4cs
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 8, 2021
दरम्यान राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघाचे आमदार आहेत.अहमदनगर जिल्ह्यात राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना होता. हा कारखाना तोट्यात निघाल्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केला. यानंतर २०१२मध्ये या कारखान्याचा लिलाव जाहीर करण्यात आला. हा लिलाव जाहीर झाला तेव्हा प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे हे बँकेच्या संचालक मंडळावर होते. कारखान्याचा लिलाव जाहीर केला तेव्हा कारखान्याची विक्री किंमत २६ कोटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाईड या कंपनीने तो केवळ १३ कोटी रुपयांना विकत घेतला. दरम्यान याच व्यवहारप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राजकारण करण्यासाठी ओबीसी आरक्षणाचे लचके तोडत आहेत; संभाजी ब्रिगेडचा आक्रमक प्रतिक्रिया
- ‘नागालँड प्रकरणाची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ कधी होणार?’, खा. राऊतांचा सवाल
- ‘गुप्तचर यंत्रणेच्या चुकीच्या माहितीमुळेच नागालँडमधील अमानुष प्रकार घडला’
- ईडी चौकशीनंतर राज्यमंत्री तनपुरेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
- ठाकरे सरकार अडचणीत; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
