औरंंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या अनुषंगाने नियमावली जाहीर करुनही ग्राहकांना हॉटेलमध्ये जागा उपलब्ध करुन देणाऱ्या हॉटेलचालका विरोधात तसेच विदेशी मद्य प्राशन करणाऱ्या ग्राहक आणि पार्किंगमध्ये विनाकारण जमणा-यांविरोधात मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फार्म हाऊस किचन हॉटेलमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी जागा आणि विदेशी मद्य मिळत असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली. त्यांनी बनावट ग्राहक पाठवत माहितीची शाहनिशा केली. तिथे हॉटेल मालक जागा देत असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी हॉटेलवर चपा टाकला.
ही घटना २८ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता फार्म हाऊस किचन हॉटेल, बीड बायपास परिसर, मुकूंडवाडी येथे घडली. या प्रकरणात हॉटेलचालक बाळासाहेब नागरे (रा. देवळाई), श्रीरंग देशपांडे, अविनाश कांबळे, विशाल येवले, विश्वजित बनसोडे, सुरज पवार, साहिल बैरागी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण…’ सेहवाग कडून पृथ्वी शॉचं कौतुक
- ‘महाविकास आघाडीची शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे योजना हवेत विरली’
- ‘बचपन के बिछडे आयपीएलमे मिले’ अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या ‘स्कूलमेट’
- एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही-पटोले
- मोठी बातमी : भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास

