मुंबई : शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून चिन्ह आपल्यालाच मिळणार असा दावे करण्यात येत होता. मात्र आयोगाच्या निर्णयानंतर दोन्ही गट नाराज झाले असल्याचं पाहायला मिळतं आहेत. त्यामुळे शिवसेना नाव ना एकनाथ शिंदे यांना ना उद्धव ठाकरे यांना वापरता येणार आहे. अशातच शिंदेंनी आता पुन्हा जोरात तयारीला लागले आहेत.
नवीन नाव आणि चिन्हाची नोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने उद्यापर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटासह शिंदे गट देखील वेगाने कामाला लागला आहे. एकनाथ शिंदे गटातील महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील मातोश्रीवर बैठक घेत आहेत.
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाची मागणी केली आहे. मात्र, एकनाथ शिंदेंनी अद्याप कोणतंही नावं नोंदवलं नाहीये. तरी शिवसेना शिंदे असं नाव शिंदेंकडून देण्यात येण्याचा अंदाज लावला जातोय.
शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर आता शिवसेनेचे सचिन मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे आता अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. मिलिंद नार्वेकर यांनी नव्या चिन्हाबाबत सूचक ट्विट केले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी वाघाचा फोटो ट्विट केला आहे. वाघाचा फोटो ट्विट करून त्या फोटोमध्ये आमचे चिन्ह श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे असा मजकूर आहे. नार्वेकरांच्या ट्विटनंतर शिवसेना वाघाचे चिन्ह मागणार का? या चर्चेला उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Video : काल शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला; आज शरद पवारांचा दानवेंसोबत एकाच कारमधून प्रवास
- Whatapp Update | Whatapp घेऊन येत आहे ‘हे’ नवीन इंटरेस्टिंग फीचर
- Ravi Rana | “शिंदे साहेब गरज पडल्यास…”, एकनाथ शिंदेंना आमदार रवी राणांची ऑफर
- Shivsena । धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेच्या नव्या चिन्हाबाबत नार्वेकरांचं सूचक ट्विट
- Priyanka Chaturvedi | “शिंदे गट चार दिन की चांदणी”, प्रियंका चतुर्वेदींचा शिंदे गटावर हल्ला


