🕒 1 min read
औरंगाबाद : विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री करणा-या तीन जणांवर पोलिसांनी कारवाई करीत तिघांना गजाआड केले. संचारबंदीचा फायदा घेत चढ्या भावात विविध मार्गाने विक्रीसाठी दारू आणलेल्या तिघाना पोलिसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या.
ललीत गणेश बोहरा (वय ३२, रा. फुलेनगर), संदिप सुर्यभान साळवे (वय २१, रा. आंबेडकरनगर), सचिन भाऊसाहेब वखरे (रा. शिवशंकर कॉलनी,गारखेडा परिसर) अशी अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री करणा-यांची नावे आहे.
ते हि दारू कुठे नेत होते, कोणाकडून आणली याचा तपास पोलीस करत आहे. संचारबंदी मुळे लावलेल्या नाका बंदी मुळे अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी तिघांविरूध्द अनुक्रमे एमआयडीसी वाळूज, सिडको आणि जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून विरार घटनेच्या चौकशीचे आदेश
- ‘विरारसारख्या घटना वारंवार घडताहेत, कठोर पावलं उचलणे गरजेचे’, मंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्विट
- कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची आज उच्चस्तरीय बैठक
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
