Share

चोरांना पाहून पळून गेलेल्या पुण्यातील पोलिसांवर कारवाई

Published On: 

🕒 1 min read

पुणे : साधारणतः पोलिसांना पाहून चोर पळल्याच्या घटना नेहमी घडतात पण पुण्यातील औंध येथे एक अजब प्रकार घडला आहे. एका सोसायटी मध्ये चोर शिरले. चोर आल्याची चाहूल लागताच कोणीतरी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हे पोलीस आले खरे मात्र, चोरांना पाहून पोलिसांनीच धूम ठोकली आहे.

चोरांची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखलही झाले. परंतु त्यांनी या चोरांना रोखले नाही किंवा त्यांना पकडण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट त्यातील एक कर्मचारी चोरांना पाहून पळून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात केलेल्या अधिक चौकशीनंतर या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य करीत असताना केलेला निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा आणि भित्रेपणामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन करणारी असल्यामुळे दोघांनाही शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

हवालदार प्रवीण गोरे यांनी आरोपींना पाहून दुचाकी वळवून निघून गेले. तर दुसऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींचे वाहन निघून जाण्याआधी गोरे पोलीस हवालदार अवघडे यांना एकटे सोडून निघून गेल्याचे दिसत आहे. पोलीस नाईक अनिल अवघडे यांच्याकडे एसएलआर रायफल असूनही त्यांनी कोणताही प्रतिकार केला नाही. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!