🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये पडलेल्या दुष्काळामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे, यामध्येच मागील तीन महिन्यात ६१० शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. सहकार व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत हि माहिती दिली आहे.
मागील तीन महिन्यात राज्यभरात ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये १९२ प्रकरणे जिल्हास्तरीय समितीत पात्र ठरवण्यात आली आहेत. त्यातील १८२ प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर ९६ प्रकरणे निकषात बसत नसल्याने ती अपात्र ठरवण्यात आली असून ३२३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचे सुभाष देशमुख यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे.
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत, शेतकरी आंदोलनानंतर राज्यात कर्जमाफी देखील देण्यात आली आहे, मात्र दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे २०१५ ते १८ च्या दम्यान एकूण १२०२१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं पुढे आलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

