Share

नगर दुर्घटना, ‘अज्ञातां’विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Published On: 

अहमदनगर : अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या विभागात कोरोनाबाधित १७ रुग्ण उपचार घेत होते. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

तर दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात शनिवारी झालेल्या अग्नितांडवानंतर जिल्हा रुग्णालयातर्फे कोणीही पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास गेले नाही. त्यामुळे तोफखाना पोलिसांनी स्वत:हून याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जुबेर अहमद मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ‘अज्ञात’ व्यक्तींविरुद्ध हा गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादीत म्हटल्यानुसार, शनिवारी सकाळी साडेदहा वाजता जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डमध्ये अज्ञात व्यक्तीने आग लागणे, आग विझवण्याचा प्रयत्न करणे, रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे, रुग्णांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवणे, यात हलगर्जीपणा केल्यामुळे ११ रुग्णांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे या अग्निकांडाला कारणीभूत असलेल्यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्नीकांडाबाबत आरोग्य यंत्रणेने तत्परता दर्शवत पोलिस ठाण्यात फिर्याद देणे अपेक्षित होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये केवळ कोविड चाचणी करून घरी निघून गेलेल्या व्यक्तींवर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते. शनिवारी मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाची भूमिका विरोधाभास दिसून आला. त्यामुळे पोलिसांनीच संवेदनशीलता दर्शवत गुन्हा नोंदवला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!