Share

दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप; सय्यद गिलानींचा नातू शासकीय नोकरीतून बडतर्फ

Published On: 

🕒 1 min read

जम्मू-काश्मीर : दहशतवादी कारवायांना मदत केल्याच्या आरोपावरून शनिवारी जम्मू-काश्मीर प्रशासनाने फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे नातू अनीस-उल-इस्लाम यांना सरकारी सेवेतून बडतर्फ केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने राज्यघटनेच्या अनुच्छेद ३११ अंतर्गत विशेष तरतुदींचा वापर करून अनीसला सरकारी सेवेतून काढून टाकले. अनीस यांची शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर मध्ये संशोधन अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. हे सेंटर जम्मू-काश्मीर सरकारच्या सर्वात प्रतिष्ठित अधिवेशन आणि परिषद सुविधांपैकी एक असून ते उच्चस्तरीय बैठका तसेच व्हीव्हीआयपी परिषदांसाठी वापरले जाते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गिलानी यांनी त्यांच्या अनीसच्या सरकारी नोकरीसाठी हिंसाचार केला होता. त्यानंतर गिलानी यांचे १ सप्टेंबर रोजी निधन झाले. सरकारी सेवेत नियुक्ती होण्याच्या काही महिन्यांपूर्वी, अनीस ३१ जुलै ते ७ ऑगस्ट २०१६ काळात पाकिस्तानला जाऊन आला होता. तसेच गिलानींच्या सांगण्यावरून तिथे तो इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे कर्नल यासीरला भेटला होता, अशी माहिती सूत्रांनी न्यूज १ ८ला दिली. २०१६ मध्ये दहशतवादी बुरहान वानी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाल्यानंतर कट्टर फुटीरतावादी गिलानी यांनी राज्यात अशांतता घडवून आणली होती. यावेळी अनीसची नियुक्ती करण्यासाठी राज्य सरकारवर प्रचंड दबाव होता. तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेत अनीसच्या फायद्यासाठी फेरफार करण्यात आला होता.

दरम्यान, सरकारी नोकरीत नियुक्ती होण्यापूर्वी अनीस श्रीनगर आणि त्याच्या आसपास कायदा आणि सुव्यवस्थेच्या घटना आणि इतर घटनांचे व्हिडिओ शूट करण्यासाठी ड्रोन उडवण्याची सोय करायचा आणि ते फुटेज आयएसआयकडे पाठवत होता. याशिवाय अनीस युएई आणि सौदी अरेबियामधील तीन संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याचेही सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!