मुंबई: लखीमपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक केली आहे. पोलिसांनी आशिष मिश्राला शनिवारी सकाळी ताब्यात घेतले होते. त्याची जवळपास 12 तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्याला अटक केली आहे.
या प्रकरणी आता न्यायालयने आशिष मिश्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर आज त्याच्या रिमांड अर्जावर सुनावणी होणार असून आज न्यायदंडाधीऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे.
दरम्यान, मुलास अटक होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत चालला आहे. वास्तविक जीपने शेतकऱ्यांना चिरडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आशिष याला अटक व्हावी म्हणून दबाव वाढत चालला होता. या घटनेच्या निषेधार्थ आता शेतकरी संघटनांनी रेल रोको आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच संदर्भात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाणे पालिकेने ‘याकडे’ दुर्लक्ष केले तर..’, मंत्री जितेंद्र आव्हाडांचा इशारा
- बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच ‘चंदा’; भाजपचा ठाकरे सरकारला टोला
- अन्नदात्यांचे ऋण फेडण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा’, शिवसेनेचे आवाहन
- ‘महाविकास आघाडीवर नाराज असलो तरी महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा’
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया

