Share

पवारांच्या मते राहुल गांधी नव्हे तर ‘हे’ तीन नेते असतील पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार असतील, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमत्री होते. त्याच धर्तीवर एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास मुख्यमंत्रिपदाचा अनुभव असलेले चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि मायावती हे मला पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय दिसतात, असेही पवार म्हणाले.

दरम्यान, पवारांना आपल्या यादीत राहुल गांधींचं नाव न ठेवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुल गांधींनी अनेक वेळा सांगितलं आहे की, मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, याचा उल्लेखही पवारांनी केला आहे. पण हे तिन्ही नेते राहुल गांधींपेक्षा चांगले पंतप्रधान ठरू शकतात का, असा विचारलेल्या प्रश्नावर पवारांनी मौन साधलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!