Share

नागपूर शहरातील रस्ते, फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला गती

Published On: 

🕒 1 min read

नागपूर  : शहरातील सर्व झोन अंतर्गत येणारे रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानंतर शहरात कारवाईला गती मिळाली आहे. सोमवारी  शहरातील दहाही झोनमध्ये विविध भागात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.

शहरात फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमण संदर्भात मनपाने अतिक्रमणधारकांविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून शहरातील सर्व भागांमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी एकाच वेळी मोहीम चालविण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानंतर सोमवारपासून संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली.

यामध्ये गांधीबाग झोन अंतर्गत असलेल्या मोमीनपुरा कब्रस्तान मार्गावरील जवळपास २५ अतिक्रमण हटविण्यात आले. याशिवाय धंतोली झोनमधील सुभाष रोडवरीलही अतिक्रमण काढण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत सीआयडी कार्यालयाजवळ पथकाने कारवाई करून सदर परिसर अतिक्रमणमुक्त केला.

हनुमाननगर झोनमधील प्रभाग ३३मध्ये पार्कींग भागात बेकायदेशीर बांधकाम तोडण्यात आले. नेहरूनगर झोनमधील भागातही अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. उपायुक्त (अतिक्रमण) महेश मोरोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व झोनच्या सहाय्यक आयुक्तांनी आप-आपल्या झोनमध्ये अतिक्रमण मुक्त करण्याच्या कारवाईचे नेतृत्व केले.

अतिक्रमण निर्मूलन संदर्भात शहरातील सर्व भागांमध्ये नियमित प्रभावी कारवाई व्हावी यासाठी कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक, सिव्हील इंजिनिअरिंग असिस्टंटसह ८ मजूर मिळून प्रत्येक वॉर्डात पथकाचे गठन करण्यात आले असून मोहीम राबविण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!