Share

अबू आझमी म्हणतात…राज ठाकरे कोण आहेत?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसापासून मनसे बदलणार आहे याचे संकेत मिळत होते. दि.२३ जानेवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचे औचित्य साधून ‘मराठी‘ बाण्यासाठी लढणारी मनसे आता ‘ हिंदुत्ववादी ‘ झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदललेल्या अंदाजात आज अगदी रुपात समोर आली आहे.झेंड्यात बदल तर केलाच आहे. पण आता विचारधारेत सुद्धा बदल झालेला दिसून आला आहे.

देशहित लक्षात घेवून मनसेने सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दिले आहे. समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मनसेने सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दिल्याने अबू आझमी यांचे चांगलेच पित्त खवळले आहे.

राज ठाकरे यांच्यावर टीका करताना आझमी म्हणाले, राज ठाकरे कोण आहेत? मनसेचा अवघा एक आमदार आहे. राज ठाकरेंना मीडियाने एवढा मोठं केलं आहे. शॅडो कॅबिनेट वगैरे हे केवळ नाटक आहे. आता राज ठाकरेंचे कोणतेही स्थान नाही.

tv9 marathiने दिलेल्या वृत्तात,मला बदबू आझमी म्हणणारे राज ठाकरे आमदार त्रस्त आहेत, त्यांचे आमदारच निवडून येत नाहीत. ना आमदार, ना नगरसेवक. थकलेल्या, हरलेल्या राज ठाकरेंना कुणीच जवळ न केल्याने, ते भाजपसोबत जात आहेत. शिवसेना तीस वर्षापासून कार्यरत आहे. त्यांना भाजपने धोका दिला आहे. आता शिवसेना केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये वाढणार आहे, याची मला खात्री आहे, असं अबू आझमी म्हणाले.

शिवसेनेविरुद्ध उभे राहून शिवसेनेची जागा घेण्याचा मनसे प्रयत्न करीत आहे. सरकार स्वतः पाकिस्तानी, बांगलादेशींना बाहेर काढण्याचे काम करत आहे. फोन टॅपिंग प्रकरण असो अथवा इतर कोणताही गैरमार्ग, महाविकास आघाडी यामध्ये लक्ष घालेल, असंही अबू आझमींनी स्पष्ट केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!