Share

बाळासाहेब कधी उत्तर प्रदेशला गेले नाहीत उद्धव ठाकरे तिकडे जायचं म्हणत आहेत : आझमी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- राम मंदिराच्या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू  आझमी यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरे उत्तरप्रदेशला जात आहेत, त्यांचे वडील गेले नाही, आणि हे जायचे म्हणतात, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. मंदिराचे मुद्दे निवडणूक काळातच कसे आठवतात, असा प्रश्नही आझमींनी उपस्थितांना केला.आझमी नाशिक येथे आयोजित लोकतंत्र बचाव महारॅलीमध्ये बोलत होते.

कोर्टाने जर अयोध्यामध्ये सांगितले मंदिर करा तर नक्कीच करा. मात्र, न्यायालयाने जर सांगितले मशिद बांधा तर मशिद बांधायला तयार रहा, असे मत देखील अबू आझमी यांनी मांडले. मंदिरांवर जे राजकारण करत आहेत त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्याबाबतचे पत्र न्यायालयाला दिल्याचे त्यांनी सांगितले. ‘सारे जहाँसे अच्छा’ असा नारा देणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या घरातील कुणी नव्हते तर ते मुस्लिमच होते, असा टोलाही आझमी यांनी शिवसेनेला लगावला.

महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ; राष्ट्रवादीच्या इतर महिला नेत्याप्रमाणे सुप्रिया सुळेंचेही मौन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!