औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षांवर बलात्काराचे आरोप होताच रस्त्यावर उतरलेल्या भाजपने मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील आरोपांवर मात्र मौन धारण केले आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतरही भाजपने आंदोलन न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकंदरीत भाजप सोयीचे राजकारण करू पाहत असल्याची टीका सर्वत्र होत आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणात भाजप राष्ट्रवादीस सळो की पळो करुन सोडेल अशी एकंदरीत अपेक्षा केली जात होती. मात्र भाजपने या प्रकरणात फारशी तत्परता दाखवली नाही.
गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मातब्बर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची राळ उठली आहे. एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या मुंबईतील नेत्यांनी केली. काही दिवसांपूर्वी बीडचा युवक राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेखवर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता. या प्रकरणात या प्रकरणानंतर भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी औरंगाबादेत येऊन आंदोलन केले. सरकारवर टीकेची झोड उठवली, त्याचबरोबर मराठवाड्यातील बहुतांश शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले.
महिला आघाडीही रस्त्यावर उतरली होती. हे प्रकरण ताजे असतांनाच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रकरण समोर आले. गेल्या दोन-चार दिवसांपासून राज्यभरात हे प्रकरण गाजत असतांना भाजपने मात्र मराठवाड्यात कुठेही आंदोलन केले नाही. विशेषतः बीड किंवा औरंगाबाद या दोन जिल्ह्यात मोठे आंदोलन होतील, असे बोलले जात होते. मात्र भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेच नाहीत.
महत्वाच्या बातम्या
धनंजय मुंडेंना संरक्षण द्या, त्यांचा तातडीने राजीनामा घेऊ नका – संजय राऊत
किरकोळ वादातून २७ वर्षीय तरुणाची भोसकून हत्या
‘…म्हणून काल मी स्वत: बोललो होतो, मात्र आता वेगळं चित्र पुढं आलं आहे’
कोरोनाच काउंटडाऊन सुरु ! लसीकरणासाठी उरले फक्त काही तास
देशाच्या सर्वोच्च प्रमुखांनीही शपथपत्रात माहिती लपवली होती; पवारांकडून मुंडेंची पाठराखण

