मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक मान्यवरांना कोरोनाची लागण झाली तर अनेकांचे रोजगार बुडाल्याने आर्थीक संकटही ओढावले. सोनी टिव्ही वरील प्रसिद्ध मालिका सीआयडी मालिकेत इन्स्पेक्टर अभिजीतची भूमिका साकारणारा अभिनेता आदित्य श्रीवास्तवही कोरोना काळात आर्थिक संकटात सापडला होता.
सीआयडी मालिकेतील इन्स्पेक्टर अभिजीतच्या भूमिकेने घराघरात पोहचलेल्या आदित्यने कोरोना काळात आर्थीक संकटाचा सामना केला आहे. याचा खुलासा नुकत्याच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. यावेळी तो म्हणाला की, ‘कोरोनाच्या काळात लागु केलेल्या लॉकडाउनमुळे अनेक कलाकार आणि तंत्रज्ञाच्या हाताला रोजगार नव्हता. अनेक कलाकारांना काम नसल्यामुळे आर्थीक अडचणीचा सामना करावा लागला. हीच वेळ माझ्यावरही आली होती.’ असे या मुलाखतीत आदित्य म्हणाला.
यावेळी आदित्य पुढे म्हणाला की,’सध्याच्या काळात आपण सर्वानी एकत्र येत एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. या कठीण काळात कोणतीही तक्रार न करता पुढे जाणे गरजेचे आहे’ असे प्रतिपादन आदित्यने केले. आदित्याचा नुकताच ‘वनरक्षक’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आदित्य एका वन अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात आदित्यासोबत यशपाल शर्मा, फलक खान तसचं धिरेंद्र ठाकूर हे कलाकार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
- ‘लहान मुलांमधील कोरोना रोखण्यासाठी विभागीय टास्क फोर्सची निर्मिती’
- ‘गब्बर’ पाठोपाठ ‘अजिंक्य रहाणे’ने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
- पदोन्नतीत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
