🕒 1 min read
औरंगाबाद: मला अतिशय आनंद आहे कि, अब्दुल सत्तारांना वाटतं कि नितीन गडकरी युतीच्या पुलाचे काम करू शकतात. नितीन गडकरी(Nitin Gadkari) हे आमचे मोठे नेते आहेत. मात्र अब्दुल सत्तार(Abdul Sattar) नया है वह त्यांना शिवसेनेबद्दल काय माहित ? असा प्रश्न विचारत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvees) यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तारांवर जोरदार टीका केली आहे.
जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या दरम्यान येणाऱ्या समस्या व अडीअडचणीची सोडवण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (दि.४) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटी दरम्यान भाजप आणि शिवसेना युतीचा पूल फक्त केंद्रीय मंत्री नितिन गडकरीच बांधू शकतात. असे वक्तव्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील सत्तार यांचा वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
युतीचा निर्णय फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेऊ शकतात. असे खैरे म्हणाले आहेत. आता या प्रकरणात विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सत्तार यांची खिल्ली उडवली आहे. फडणवीस म्हणाले, नितीन गडकरी युतीबाबत काम करू शकतात या सत्तारांच्या विधानाचा मला आनंद होतो. मात्र त्यांना शिवसेना कळलेली नाही. आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. मात्र गेल्या पाच ते सात महिन्यात ते उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत का? युती बाबत बोलायला महत्त्वाचा माणूस लागतो. आणि सत्तार हे स्वतःच शिवसेनेत नवीन आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- “सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
