Share

अंबड येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण!

Published On: 

🕒 1 min read

जालना: जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथे एका लहान मुलीचे अपहरण झाले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मामाकडे राहायला आलेली मुलगी लघुशंकेसाठी बाहेर आली असता अज्ञात दोन जणांनी तिला दुचाकीवर बसवत अपहरण करून पळवून नेले आहे. तेथील नागरिकांनी पाठलाग करत आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव वेगाने निघालेल्या आरोपींना पकडता आले नाही. शरीफ हबीब शेख, मोहम्मद मुनीर पठाण (ताडहदगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

अंबड तालुक्यातील ताडहादगाव येथील महिला मोलमजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत आहे. या महिलेस एक मोठा मुलगा व दोन मुली अशी तीन अपत्ये आहेत. एक मुलगी, मुलाचे लग्न झालेले असून, सर्वात लहान मुलगी (१५) मामाच्या घरी खडकेश्वर काही दिवसांसाठी राहण्यासाठी सोडले होते. २६ मे रोजी त्या मुलीचे घरचे पुणे जिल्ह्यातील शिरूळ येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान, त्यांना त्यांच्या चुलत भावाने रात्री १२ वाजेच्या सुमारास झालेला प्रकार सांगितला.

रात्रीच्या वेळी खडकेश्वर गावातील झेंड्याजवळ मोबाइल गेम खेळत असताना ताडहदगाव येथील शरीफ हबीब शेख, मोहमद मुनीर पठाण यांनी त्यांच्या जवळील दुचाकी (एमएच २१ ई ९५२१) वरून खडकेश्वर येथे आले. त्यांनी लघुशंकेसाठी घराजवळ बाहेर पडलेल्या मुलीस दोघांमध्ये दुचाकीवर बसवून घेऊन निघून गेले. त्यावेळी कोणतेही वाहन नसल्यामुळे आम्ही त्यांचा पाठलाग करू शकलो नाही. त्यानंतर ग्रामस्थ ताडहादगाव येथे शरीफ हबीब शेख व मोहंमद मुनीर पठाण यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांना झालेला प्रकार सांगितला. त्या तरुणांच्या नातेवाइकांनी तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांना बोलावून घेतो, असे सांगितले. परंतु, अजूनही मुलगी घरी परतली नाही. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात शरीफ हबीब शेख, मोहम्मद मुनीर पठाण या दोघांविरुद्ध अंबड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!