🕒 1 min read
लातूर : असं म्हणतात इच्छाशक्ती असली की कुठले ही काम अशक्य नाही. याचे एक जिवंत उदाहरण उस्तुरी येथे पहावयास मिळाले. एकिकडे कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांना विनवण्या कराव्या लागत असतानाच, उस्तुरी येथील एका ६५ वर्षीय वयोवृध्दाने तब्बल १२ किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन कोरोनाची लस घेतली.
गेल्या वर्षभरापासुन कोरोनाने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. त्यात अनेकांचा मृत्युही झाला आहे. कोरोनावर लस निर्मितीसाठी अनेक देशांनी पुढाकार घेतला असुन भारतातही सध्या दोन लसींचे उत्पादन चालु आहे. सिरम कंपनीचा कोविशिल्ड व भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसी भारतातील नागरिकांना देण्यात येत आहेत. १ मार्चपासुन ६० वर्षापुढील सर्वांना व ४५ ते ६० वर्षापर्यतंच्या व्याधीग्रस्तांना ही लस देण्यात येत आहे. तर १ एप्रिलपासुन ४५ वर्ष पुर्ण झालेल्यांना ही लस देण्यास सुरूवात झाली आहे. सध्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात या कोरोना लसीकरणाचे कार्य चालु आहे.
एकीकडे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असतानाही ग्रामीण भागात केवळ लसीसंदर्भातील गैरसमजुतीमुळे अनेक नागरिक लस घेण्यात पुढाकार घेत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नागरिकांमध्ये लस घेण्याकरिता उत्साह दिसत नसताना उस्तुरी येथील ६५ वर्षीय वयोवृध्द असलेले महादेव मंदाडे यांनी उस्तुरी ते कासार बालकुंदा हे १२ किलोमीटरचे अंतर पायी चालत जाऊन कोरोनाची लस घेऊन समाजाला चांगला संदेश दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- परमबीर सिंह हे भाजपचे डार्लिंग झाले आहेत; राष्ट्रवादीच्या नेत्याची बोचरी टीका
- पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन, दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी…
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ‘प्रिय EC, माजरा क्या है ?’ भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडल्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल
- Breaking : पुण्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘हे’ असणार कडक निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
