मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. कारण, आताही त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धनंजय मुंडे यांच्या संपत्तीबद्दल सगळी माहिती दिली आहे. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबईत आमदारांसाठी बांधली जाणारी इमारत बांधू नका, त्यासाठी ऐवढा कोट्यवधी पैसा खर्च करण्याची गरज नाही अशी विनंती करुणा मुंडे यांनी केली आहे. याकरिता येत्या ५ जूनपासून आपण उपोषण करणार असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी संवाद साधताना दिली.
काय म्हणाल्या व्हिडिओत?
‘मी एक आमदाराची पत्नी आहे. माझे पती धनंजय मुंडे मंत्री आहेत. जेव्हा माझे पती विधानपरिषद आमदार होते तेव्हा परळीमध्ये तीन बंगले, एक फार्म हाऊस, पुण्यात दोन मोठमोठे बंगले आणि मुंबई आमचे दोन मोठमोठे फ्लॅट आहेत. एक नरीमन पॉईंटला एक सांताक्रूझला. त्यानंतरही आम्हाला सरकारी बंगला मिळाला आहे. ते जेव्हा आमदार होते तेव्हाचे हे सारे मिळवले होते.
https://www.facebook.com/101087078496774/videos/832925374313749/
यामुळे मी सरकारला विनंती करते की, आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च का करावेत? पोलिसांच्या वस्त्या नवीन बनवा, दुरुस्त करा. जी इमारत आमदार निवासासाठी उभारली जात आहे त्यावर एवढे पैसे खर्च करण्याची गरज काय गरज आहे? हा पैसा सामान्यांसाठी वापरा असे आवाहन त्यांनी केले आहे.
‘आदित्य ठाकरेंनी तीन हजार सहाशे कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्याच्या रिनोव्हेशनसाठी दिले आहेत. माझे पती विरोधी पक्षनेते होते, तेव्हा मी त्यांच्या बंगल्यावर जायचे. असे बंगले किंवा ज्या पाडून पुन्हा बांधायची गरज नाहीय त्यावर पैसे खर्च करू नका. आमदार असताना जिथे जिथे जातात तिथे जर बंगले उभे करत असतील तर त्यांच्यासाठी मनोरा बांधण्याची काय गरज.
मालाडमध्ये २० बाथरुम बांधून तयार आहेत, तेथील लोक माझ्याकडे आले. मी तेथील आमदाराला पत्रही लिहिले. मलाच उलटी नोटीस पाठविण्यात आली. तेथील बाथरूम जाऊन मुख्यमंत्र्यांनी पहावेत. तेथील परिस्थिती पाहून मला चक्कर आली. बंद असलेल्या बाथरुमचे टाळे खोला, महानगरपालिकेच्या निवडणुकांची वाट पाहिली जातेय, असा आरोप केला आहे.
दरम्यान, याआधीही करुणा मुंडे यांनी एक फेसबूक पोस्ट करत लवकरच त्यांची प्रेमकथा मांडणारं पुस्तक प्रकाशित करणार असल्याची माहिती दिली होती. यामुळे आधीच राजकीय चर्चांना उधाण आलंय. दोन दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी राज्यपालांना देखील तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आणि धनंजय मुंडेकडून जिवाला धोका असल्याबाबत पत्र लिहिले आहे.
या व्हिडिओमुळे धनंजय मुंडे यांना आणखी काय अडचणींचा सामना करावा लागणार? विरोधक यावर काय प्रतिक्रिया देणार? इतकंच नाहीतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काही उत्तर देणार का? असे अनेक प्रश्न यानिमित्त उभे राहिलेत.
महत्वाच्या बातम्या
- आवरा यांना ! भाजप नेता कोरोनाला घालवण्यासाठी यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर फिरतोय…
- अखेर ‘त्या’ वादावर पडदा ; जयंत पाटलांच्या प्रकल्पांना मंजूरी
- ‘राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून घेण्यात येणार’- अमित देशमुख
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार कोकण दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार !
- ‘चंद्रकांतदादा, मोदींचा राजीनामा घेऊन निवडणुका घ्याच, मग समजेल जनतेच्या मनात काय आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

