Share

मुंबई इंडियन्सचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Published On: 

मुंबई : आयपीएलचे १४वे सत्र येत्या ९ एप्रिल पासून सुरु होत आहे. सर्व संघ स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना हा आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने विजेतेपद मिळवले होते. यावेळी कोणता संघ ट्रॉफीचा दावेदार ठरणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे. यावर्षी सगळेच संघ जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहेत.

दरम्यान, नुकताच मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कर्णधार रोहित शर्मासह मुख्य प्रशिक्षक जयवर्धने यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचबरोबर मुबंई इंडियन्सचा संघ आयपीएल खेळताना नेमकं काय करत असतो, हे देखील या व्हिडीओमधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्सने गेल्यावर्षी आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाची मानसीकता कशी होती. ते नेमकं काय करत होते आणि हा संघ नसून एक कुटुंब कसं आहे, हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. आयपीएल सुरु असताना खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी त्यांच्यामधील संवाद किंवा मैत्रीपूर्ण नातं वाढवण्यासाठी नेमकं काय केलं जातं, हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!