Share

शहा-ठाकरे भेटी आधी शिवसेनेचा नवा नारा, अब की बार उद्धव सरकार

Published On: 

टीम महाराष्ट देशा : शिवसेना भाजप युतीवर होणार हे निश्चित झाले आहे. आज संध्याकाळी भाजप अध्यक्ष अमित शहा हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार आहेत. या भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली जाणार असल्याचं सांगितल जात आहे. दरम्यान या भेटीपूर्वी शिवसेनेकडून ‘अब की बार उद्धव सरकार’चा नारा देण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी काही दिवसच शिल्लक असताना देखील युतीचे घोंगडे भिजत पडले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. परंतु आता युतीवर शिक्कामोर्तब होत आहे.

अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस हे मातोश्रीवर येणार आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची चर्चा होईल. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीच्या फोर्म्युल्याची दोन्ही प्रमुख नेते घोषणा करतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, राऊत यांनी अब की बार उद्धव सरकार’चा नवा नारा दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!