Share

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आमीर खानने दिला ‘मदतनिधी’

Published On: 

मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर हिंदुस्तान टाइम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमीर खानने खुलासा न करता पीएम केअर फंड व मुख्यमंत्री रिलीफ फंडात निधी दिला आहे. याशिवाय आमीर खानने काही फिल्म वर्कर असोसिएशन आणि सामाजिक संस्थांना मदतनिधी दिला आहे. याशिवाय लॉकडाउनमध्ये आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढाशी निगडीत दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या कामगारांनाही त्याने मदत केली आहे.

याबाबत आमीर खानने आतापर्यंत केलेल्या मदतीचा खुलासा केलेला नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार समजतंय की आमीर खानने पीएम केअर फंड व मुख्यमंत्री रिलीफ फंडात निधी दिला आहे.

दरम्यान, अक्षय कुमार, शाहरूख खान, कार्तिक आर्यन, रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांसारख्या बऱ्याच कलाकारांनी पीएम केअर फंड व मुख्यमंत्री रिलीफ फंडात डोनेशन दिले आहे. तर सलमान खान 25000 दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या कामगारांची मदत केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!