टीम महाराष्ट्र देशा : ‘रामदास आठवलेंना संसदेत पण कुणी गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे त्यांना अजिबात गांभीर्याने घ्यायला नको. आठवलेंना आता कोणी जवळ करायला तयार नसून त्यांनी शरद पवारांपर्यंत निरोप पाठवले पण ते सुद्धा त्यांना जवळ करायला तयार नाहीत, त्यामुळे कोणाचेही पाय पकडायचे कसब त्यांच्याकडे आहे ते आमच्याकडे नाही’ अशी टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केलं. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.
तसंच ‘आपण कसं वागतो त्यावर आपली किंमत ठरते, आपली किंमत आपणच कमी करून घेतली की काय होत याच ते उदाहरण’ असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री तसेच उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मात्र याचा अर्थ आम्हाला वाऱ्यावर सोडून द्यावे असा अर्थ होत नाही. आम्हाला दक्षिण मुंबईची जागा हवी आहे. अमित शाह शिवसेनेशी युतीसाठी आले तेंव्हा आम्हाला बोलावून घ्यायला हवं होतं. अशी खदखद रामदास आठवलेंनी बोलून दाखवली आहे.
तर , गेली साडेचार वर्ष शिवसेना तुमच्यावर टीका करत आहे, असे असतानाही तुम्ही त्यांना सोबत घेऊन आम्हाला बाजूला करत आहात. परंतु आरपीआयला सोडून युतीच्या जागा निवडून येणं शक्य नसल्याचा, दावा आठवले यांनी केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

