Share

गणेश नाईक भाजपची सत्ता येईल म्हणून भाजपवासी झाले, अजितदादांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

नवी मुंबई : नवी मुंबईतील शिवसेनेचे नेते नामदेवराव भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षप्रवेश झाला.

यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सोहळा छोटेखानी स्वरूपात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, आदरणीय पवार साहेब यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहोत. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत आहोत. त्यामुळे अनेक जण प्रभावित होऊन राष्ट्रवादीत येऊ इच्छितात, या भावनेतूनच नामदेव भगत यांनी पक्षात प्रवेश केला, असे अजित पवार म्हणाले.

गणेश नाईक यांना नवी मुंबई आंदण दिल्यासारखे होते. पण गणेश नाईक भाजपची सत्ता येईल म्हणून भाजपवासी झाले. ते जरी भाजपमध्ये गेले असले तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीसोबत आजही आहेत. भगत यांनी सामाजिक, राजकीय जीवनात प्रचंड काम केले आहे. लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. त्यामुळे नामदेव भगत यांच्या रुपाने एक खंदा कार्यकर्ता पक्षाला लाभला असल्याचे अजित पवार सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांची विचारपूस केली जाते, त्यांचा सन्मान ठेवला जातो म्हणून पक्षात प्रवेश केला. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पूर्ण करेन, असा विश्वास नामदेवराव भगत यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अनिल गोटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!